मराठा मंदिर कलाकेंद्र

मराठा मंदिर या अग्रगण्य संस्थेचे कलाकेंद्र हे दालन १९५९ साली सुरु करण्यात आले. या कालाकेंद्राचा उद्देश मराठा मंदिर आणि अन्य समाज यांच्यामध्ये सांकृतिक देवाण घेवाण होऊन कलावंतांत त्यांच्या कलेमध्ये उत्तेजन मिळावे व जास्तीत जास्त कलाकारांना यामध्ये सहभाग मिळावा हा आहे.

त्या दृष्टीकोनातून कलाकेंद्र हा उपक्रम राबविण्यात येतो. गायन, नृत्य इत्यादी कार्यक्रम विविध कलावांतानद्वारे मराठा मंदिरच्या सभागृहात साजरे करता येतात.

सध्या कलाकेंद्रात कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र प्र.गावडे असून श्री.शंकर द.पालदेसाई हे उपाध्यक्ष आहेत.सचिव म्हणून सौ.वैशाली भेंडे हे काम पाहत आहेत.

या कलाकेंद्राने नाटक, गायन, एकांकिका इत्यादी सादर सरून नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देखील देता येते. तसेच हस्तकला व चित्र कला यांचे हि मार्गदर्शन दिले जाते.